उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल यांच्या जागेवर ३ सप्टेंबरला निवडणूक

0
42

दि. ७ ऑगस्ट (पीसीबी) – केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील दोन मतदारसंघांसह 9 राज्यांतील 12 जागांसाठी निडणुका जाहीर केल्या आहेत. उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल यांच्या जागेवर निवडणूक होणार असून या जागांसाठी ३ सप्टेंबर रोजी मतदान होऊन मतमोजणी होणार आहे.महाराष्ट्रातून लोकसभा निवडणुकीत भाजपचे उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल हे दोघेही राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आले. आता राज्यात त्यांच्या जागी पोट निवडणूक होणार आहे. हे दोन्ही खासदार भाजपचे आहेत. त्यामुळे भाजपमध्ये महायुतीमधून लढत होणार हे स्पष्ट आहे.

या निवडणुकीत उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल यांच्या जागेवर कोणाला संधी मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपसोबत युती करण्यासाठी फिल्डिंगही चांगलीच लागली आहे. भाजप या जागावर कोणाला संधी देतात, याकडे लक्ष लागले आहे. पण भाजप नेते देवेंद्र फडणवीस कोणाच्या नावाचा अहवाल केंद्राकडे पाठतात हे देखील पाहावे लागणार आहे.

निवडणूक कार्यक्रम
केंद्रीय निवडणूक आयोगानुसार, राजस्थान, हरियाणा, बिहार, आसाम, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, त्रिपुरा, तेलंगणा आणि ओरिसा या 9 राज्यांतील 12 जागांवर निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगानुसार १४ ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार असून २१ ऑगस्ट हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. 22 ऑगस्ट रोजी स्क्रीनिंग होणार आहे. आसाम, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि त्रिपुरामध्ये उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 26 ऑगस्ट आणि बिहार, हरियाणा, राजस्थान, तेलंगणा आणि ओरिसामध्ये उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे. 3 सप्टेंबर रोजी जगभरात मतदान होणार असून 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता मतदानाचा निकाल घोषित करणार आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीच्या दोन्ही ठिकाणांबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. या दोन्ही जागा भाजप जवळपास निश्चितच जिंकणार हे स्पष्ट आहे. भाजपकडे 106 आमदार आणि 15 पक्ष आहेत, म्हणजे 121 आमदार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून जवळपास ९० आमदार आहेत. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होईल, अशी दाट शक्यता आहे.