उत्तराखंडमध्ये ढगफुटीत अडकले मंचरचे २४ यात्रेकरू

0
6

दि. ६ (पीसीबी) – उत्तराखंडमध्ये ढगफुटीसदृश पावसामुळे यमुनोत्री परिसरात पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत महाराष्ट्रातील सुमारे दीडशे पर्यटक अडकले असून या पर्यटकांमध्ये पुण्यातील मंचर येथील २४ रहिवासींचा सहभाग आहे. या परिस्थीतीतून बाहेर पडण्यासाठी राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना ट्विट करत मदतीची विनंती केली आहे.

पुण्यातील मंचर येथील सुमारे २४ नागरिक उत्तराखंडमध्ये अडकले आहेत. गेल्या २४ तासांपासून त्यांच्याशी कोणताही संपर्क झाला नसल्याने त्यांचे नातेवाईक चिंतेत आहेत. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेची दखल घ्यावी अशी विनंती करते त्यांना लवकरात लवकर या अडचणीत बाहेर काढावे. असे सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच यावेळी त्यांनी अडकलेल्या व्यक्तींची नावे आणि त्यांचा संपर्क क्रमांक दिला आहे.