उत्तराखंडमध्ये ढगफुटीचा कहर; ६० बेपत्ता, १०० हून अधिक अडकले, बचावकार्य सुरुच

0
136


उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथून एक धडकी भरवणारा व्हिडीओ समोर आला आहे. येथील हर्षिलमध्ये ढग फुटल्याने प्रचंड मोठं नुकसान झाले. ६० लोक बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर कित्येक लोकं ढिगाऱ्याखाली दबले गेल्याचेही वृत्त आहे. या अपघातात आतापर्यंत नेमका किती जणांचा मृत्यू झाला याची अधिकृत माहिती समोर आली नसली तरी १०० हून अधिक लोक तिथे अडकले असल्याची शक्यता आहे.

या घटनेनंतर उत्तराखंड आपत्तीबाबत आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली आहे. गढवालच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. यामध्ये मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेण्यात येणार आहे. घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्यासाठी पथके घटनास्थळी रवाना झाले आहेत. भटवाडी येथील एसडीआरएफ पथकही धाराली येथे रवाना झाले आहे.