पिंपरी, दि.10 (पीसीबी) – मुसळधार पावसाने महाराष्ट्रात थैमान घातलं आहे. राज्यात मुंबईमध्ये पावसाने प्रचंड नुकसान केलंय. रायगड, सिंधुदुर्ग या ठिकाणी देखील पावसाचा तडाखा बसला. यामुळे शेतीचं देखील बरंच नुकसान झालंय. सध्या राज्यासह देशातील अनेक भागात जोरदार पाऊस बरसत आहे. नुकतीच उत्तराखंड येथून एक मोठी माहिती समोर आली आहे.
उत्तराखंडमधून भूस्खलनाचा एक भयानक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडिओ बघून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. उत्तराखंडमधील चमोली येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्यामुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे.
पातालगंगा लंगसी बोगद्याजवळ भूस्खलन –
पातालगंगा लंगसी बोगद्याजवळ ही भयानक भूस्खलनाची घटना घडली आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. चमोली जिल्ह्यातील पातालगंगा येथे भूस्खलन झालं आहे. अवघ्या काही सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये डोंगराचा मोठा भाग तुटून महामार्गावर पडताना दिसतोय.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय की, डोंगराचा एक मोठा भाग कोसळून महामार्गावर पडतो, दोन्ही बाजूला लोक दिसत आहेत.डोंगराचा मोठा भाग तुटून रस्त्यावर पडताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ आता तूफान व्हायरल झाला आहे.