उडाण नारीशक्ती रन: महिलांच्या उत्साहपूर्ण सहभागाने बाणेरमध्ये यशस्वी आयोजन

0
25

दि. 5 (पीसीबी)  – आज सकाळी ६ वाजता बाणेर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान, ताम्हाणे चौक येथे पूनम विशाल विधाते आयोजित, ‘उडाण नारीशक्ती रन’ उपक्रम उत्साह आणि जल्लोषात यशस्वीपणे पार पडला. या उपक्रमात महिलांचा प्रचंड सहभाग आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवली गेली.

कार्यक्रमासाठी खासदार सौ सुनेत्रा वहिनी पवार तसेच मा. ना. श्री. चंद्रकांत दादा पाटील (उच्च तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य) तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मा. सौ. रूपाली चाकणकर उपस्थित होते.

‘उडाण नारीशक्ती रन’ हा उपक्रम केवळ महिलांच्या आरोग्यासाठीच नाही, तर त्यांच्या सशक्तीकरणासाठी प्रेरणादायी ठरला आहे.