उच्चभ्रू सोसायटीतील जिन्यात ८५ वर्षीय वृद्धेवर बलात्कार

0
113

इलेक्ट्रिशन कामगार असणारा २३ वर्षीय आरोपी अटकेत

दि. 25 (पीसीबी) – आयटी हब म्हणून ओळखळ्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरालगतच्या म्हाळुंगेतील एका उच्छभ्रू सोसायटीमध्ये आपल्या फ्लॅटसमोर चालत असणाऱ्या ८५ वर्षीय महिलेवर एका २३ वर्षीय नराधमाने बलात्कार केला. वृद्धेला फ्लॅटसमोरून लिफ्टपर्यंत ओढत नेत तोंड दाबून या नराधमाने वृद्धेवर बलात्कार केला. दरम्यान, हिंजवडी पोलिसांनी घटनेनंतर तासाभरातच आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.ओम जयचंद पुरी (वय २३, सध्या रा. साखरे वस्ती, मुळ रा. धाराशिव) याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणी पिडीत वृद्धेच्या ५७ वर्षीय मुलीने या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. म्हाळुंगेतील एका उच्चभ्रू सोसायटीतील पाचव्या मजल्यावरील स्वत:च्या फ्लॅटसमोरील जागेत सोमवारी (२३ सप्टेंबर) संध्याकाळी साडेसहा वाजता हा घृष्णास्पद प्रकार घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी पिडीत वृद्ध महिला सोसायटीतील पाचव्या मजल्यावरील आपल्या फ्लॅट समोर चालत होती. सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये तीन दिवसांपूर्वी इलेक्ट्रीशनचे काम करण्यासाठी आरोपी सोसायटीमध्ये आला होता. त्यानंतर पुन्हा सोमवारी तो पाचव्या मजल्यावर आला असता त्याने वृद्धेला पाहिले. तसेच मजल्यावर कोणीही नसल्याने त्याने वृद्धेवर झडप घालत तीचे तोंड दाबले. त्यानंतर जिन्यातून फरफटत सहाव्या व सातव्या मजल्याच्या जिन्यातील मोकळ्या जागेत नेऊन वृद्धेवर बलात्कार केला. बलात्कार करताना वृद्धेचा गळा दाबला तसेच वृद्धेला हाताने मारहाण केली. हा सर्व प्रकार तब्बल पाऊण तास सुरू होता. हा प्रकार सुरू असताना वृद्धा प्रतिकार तसेच आरडाओरडा करत होती. त्यामुळे आरोपी पळून गेला.

दरम्यान, वृद्धेने हा प्रकार घरी जाऊन सांगतिला. घरच्यांनी तातडीने हिंजवडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी घटनेचे गांभिर्य ओळखून तातडीने तपासाची चक्रे फिरवली. चार दिवसांपूर्वी हा आरोपी सोसायटीमध्ये काम करण्यासाठी आला होता. त्यानंतर सोमवारी हा आरोपी पुन्हा सोसायटीत आला. त्यानंतर त्याने हे घृणास्पद कृत्य केले. पोलिसांनी सोसाटीच जाऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. त्या अनुषंगाने आरोपीला अटक केली. मंगळवारी आरोपीला शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पॉर्न आणि दारूची नशा ?
आरोपीला अटक केली तेव्हा तो दारूच्या नशेत होता. आरोपीने हे कृत्य दारूच्या नशेत केले की त्याला पॉर्न पाहण्याचीही सवय होती, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे.

तक्रारदार पोलीस ठाण्यात आल्यानंतर घटनेचे गांभिर्य ओळखून पोलिसांनी एकिकडे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करीत सबंधित सोसायटीत जाऊन माहिती काढत आरोपीला त्याच्या घरी जाऊन अटक केली. दरम्यान, सोसायटीमध्ये कामगार आल्यानंतर तो कोणाकडे कामासाठी जात आहे, किती वेळ सोसायटीमध्ये थांबत आहे, याची खातरजमा सुरक्षारक्षकांनी संबंधित फ्लॅटधारकांकडे करणे गरजेचे आहे. – विशाल गायकवाड, पोलीस उपायुक्त