उघड्या दरवाजा वाटे घरातून 40 हजारांचा ऐवज चोरीला

0
437

वाल्हेकरवाडी रोड,दि. ७ (पीसीबी)- चिंचवड येथे एका इमारतीमधील घरातून उघड्या दरवाजा वाटे चोरट्यांनी 40 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 6) सकाळी सहा ते नऊ वाजताच्या कालावधीत घडली.

शक्तीमुथू वेदनारायण (वय 24, रा. वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे सहकारी घरी असताना त्यांच्या घराचा दरवाजा उघडा होता. उघड्या दरवाजावाटे अज्ञात चोरट्याने चार मोबाईल फोन आणि इतर वस्तू असा एकूण 40 हजार दहा रुपयांचा ऐवज चोरून नेला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.