उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरट्यांनी सव्वापाच लाखांचा ऐवज चोरून करून नेला. ही घटना शिवार चौक, पिंपळे सौदागर येथे सोमवारी (दि. ३) दुपारी उघडकीस आली.
तनु अग्रवाल (वय ३३, रा. द्वारका क्वीन्स पार्क, शिवार चौक, पिंपळे सौदागर) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी साडेतीन ते साडेचार वाजताच्या दरम्यान फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा उघडा होता. या कालावधीत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून आतील सोन्या–चांदीचे दागिने चोरी करून नेले. वाकड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.