उघड्या दरवाजावाटे दोन मोबाईल सोन्याचे गंठण चोरीला

0
120

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) वाकड,

घराच्या उघड्या दरवाजावाटे आत प्रवेश करत चोरट्यांनी दोन मोबाईल फोन आणि सोन्याचे गंठण चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 20) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास वेणूनगर, वाकड येथे घडली.

याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नितीन सिताराम थोरात (वय 28, रा. भोसरी) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरात नितीन थोरात यांनी उघड्या दरवाजावाटे प्रवेश केला. घरातून दोन मोबाईल फोन, अर्धा तोळ्याचे सोन्याचे गंठण, दोन हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 42 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.