उघड्या दरवाजावाटे देवघरातील दागिने चोरीला

0
223

चिखली, दि. ११ (पीसीबी) – उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून देवघरातील दीड लाखाचे दागिने चोरट्याने चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 10) मध्यरात्री साडेबारा वाजता पाटीलनगर, चिखली येथे घडली.

याप्रकरणी महिलेने चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा उघडा असताना उघड्या दरवाजावाटे अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील देवघरातून देवीच्या फोटोंना लावलेले दोन सोन्याचे नेकलेस एक लाख 47 हजार रुपये कितमीचे चोरट्याने चोरून नेले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.