उघड्या दरवाजावाटे तीन मोबाईल चोरीला

0
177

तळवडे, दि. ८ (पीसीबी) – घराच्या उघड्या दरवाजावाटे प्रवेश करत अज्ञात चोरट्याने घरातून तीन मोबाईल फोन चोरून नेले. ही घटना सहा फेब्रुवारी रोजी मध्यरात्री रुपीनगर तळवडे येथे घडली.

दुर्गेश शामसुंदर यादव (वय 33, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र हे खोलीमध्ये झोपले असताना अज्ञात चोरट्याने खोलीच्या उघड्या दरवाजावाटे आत प्रवेश केला. खोलीतून चोरट्याने 45 हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.