उघड्या दरवाजावाटे चोरी

0
88

पिंपरी, दि.४ (पीसीबी)

उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरट्याने सोन्‍याची चैन व रोख रक्‍कम चोरून नेली. ही घटना बालाजीनगर, भोसरी येथे घडली.

याबाबत ३९ वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्‍यानुसार अज्ञात चोरट्याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी यांच्‍या घराचा दरवाजा २३ ते २४ ऑगस्‍ट दरम्‍यान उघडा होता. त्‍यावेळी अज्ञात चोरट्याने त्‍यांच्‍या घरात प्रवेश करून आतील सोन्‍याची चैन व रोख रक्‍कम असा एकूण ५२ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.