उघड्या दरवाजावाटे चोरी

0
131

चिंचवड, दि. 6 ऑगस्ट (पीसीबी) – उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरट्यांनी दोन मोबाइल चोरून नेले. ही घटना गोलांडे कॉलनी, चिंचवड येथे सोमवारी (दि. 5) पहाटे दीड वाजताच्या सुमारास घडली.जितेंद्र बाळासाहेब सुर्यवंशी (वय 30, रा. कोहीनूर सोसायटी, गोलांडे कॉलनी, चिंचवड) यांनी सोमवारी (दि. 5) याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिातीनुसार, फिर्यादी सुर्यवंशी यांचे घर सोमवारी पहाटे दीड वाजताच्या सुमारास उघडे होते. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करीत 12 हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल चोरून नेले. चिंचवड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.