उघड्या दरवाजावाटे एक लाखाचे साहित्य चोरीला

0
256

चिंचवड, दि. ५ (पीसीबी) : उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून तीन मोबाईल फोन आणि एक मनगटी घड्याळ असा एक लाख रुपयांचा ऐवजी चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 4) सकाळी आठ ते साडेआठ वाजताच्या कालावधीत शाहूनगर चिंचवड येथे घडली.

संतोष हरिभाऊ देवकर (वय 54, रा. सहजयोग सोसायटी, शाहूनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा उघडा असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात उघड्या दरवाजावाटे प्रवेश केला. घरातून तीन मोबाईल फोन आणि एक मनगटी घड्याळ असा एकूण एक लाख दोन हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.