देशात कोणतीही निवडणूक झाली तर ईव्हीएम चर्चेत येते. निवडणुकीत विरोधात आलेला पक्ष सत्ताधारीचा विजय ईव्हीएममुळे झाल्याचा आरोप करतो. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर गेल्या काही महिन्यांपासून भारतात ही चर्चा थांबली होती. त्याला आता अमेरिकेतून फोडणी मिळाली आहे. अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या निर्देशक तुलसी गबार्ड यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात ईव्हीएम प्रमाणाली हॅक होऊ शकते, असा दावा त्या करत आहेत. त्यानंतर काँग्रेससह विविध पक्षांनी तो व्हिडिओ व्हायरल केला आहे. राहुल गांधी यांचा दावा बरोबर असल्याचे काँग्रेस नेते आता सांगत आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाने हा दावा फेटाळला आहे. भारतातील ईव्हीएम सुरक्षित असून ते हॅक करता येत नसल्याचे म्हटले आहे.भारतात वापरण्यात येणारी इलेक्ट्रानिक वोटिंग मशीन ( ईव्हीएम) आता 43 वर्षांचा प्रवास पूर्ण करत आहे. या काळात ईव्हीएमसंदर्भात अनेक वेळा वादळ निर्माण झाले. परंतु सर्वोच्च न्यायालयापासून निवडणूक आयोगापर्यंत सर्वांनी ईव्हीएम हॅक होऊ शकत असल्याचे दावे फेटाळले आहे. आता अमेरिका राष्ट्रीय गुप्तचर संस्थेचे निर्देशक तुलसी गबार्ड यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये तुलसी गबार्ड अमेरिकेतील ईव्हीएम यंत्रणा कमकुवत असल्याचे सांगतात. त्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा आग्रह केला.गॅबार्ड म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली हॅकर्ससाठी बऱ्याच काळापासून सोप्या आहेत, असे पुरावे आमच्याकडे आहे. या प्रणालीमुळे मतदानाच्या निकालांमध्ये फेरफार केला जाऊ शकतो. यामुळे देशभरात कागदी मतपत्रिकांची प्रणाली लागू करण्याची मागणी आणखी बळकट होते. त्यामुळे मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक होणार आहे. यापूर्वी अमेरिकन करोडपती उद्योगपती एलोन मस्क यांनीही इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर टीका केली होती आणि कागदी मतपत्रिकांचा पुरस्कार केला होता.निवडणूक आयोगाचा काय दावा?निवडणूक आयोगाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, तुलसी गॅबार्ड ज्या ईव्हीएमबद्दल बोलत आहेत ते अमेरिकेत वापरले जाणारे ईव्हीएम आहे. या मशीन्स सध्या जगातील अनेक देशांमध्ये वापरल्या जात आहेत. ज्यामध्ये इंटरनेट किंवा इतर नेटवर्क वापरले जातात. परंतु भारतात हे नेटवर्क वापरले जात नाही. भारतातील ईव्हीएम हॅक करता येत नाहीत किंवा त्या इंटरनेट किंवा इतर कोणत्याही नेटवर्कशी जोडता येत नाहीत.