ईडीचे दिल्ली, पंजाब आणि हैद्राबाद शहरांत ३५ ठिकाणांवर छापे

0
212

दिल्ली, दि. ७ (पीसीबी) : दिल्लीतील तब्बल ३५ ठिकाणांवर आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले आहेत. कथित दारूघोटाळा (अबकारी मनी लाँडरिंग) प्रकरणी ईडीने दिल्ली, पंजाब आणि हैद्राबाद येथील ३५ ठिकाणांवर छापेमारी केली. तर या कारवाईनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

या छापेमारीनंतर अरविंद केजरीवाल म्हणाले की, “मागच्या 3 महिन्यांपासून 500 हून अधिक छापे तर 300 हून अधिक CBI/ED अधिकारी मनीष सिसोदिया यांच्या विरोधात पुरावे शोधण्यासाठी 24 तास काम करत आहेत. या तपासात काहीही सापडले नाही कारण काहीही झाले नव्हते. इतक्या अधिकाऱ्यांचा वेळ त्यांच्या गलिच्छ राजकारणासाठी वाया जात आहे. अशा देशाची प्रगती कशी होणार?” अशा शब्दांत केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.