इस्टेट एजंटकडे मागितली 25 लाखांची खंडणी

0
382

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – पिंपरीतील इस्टेट एजन्टला फोन करून 25 लाख रुपये खंडणी मागितली. ही घटना गुरुवारी (दि.14) दुपारी एकच्या सुमारास घडली.

सुरेंद्र अर्जुन मेवानी (वय. 42, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 7767812307 या क्रमांकावरून बोलणा-या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मेवानी हे गुरुवारी दुपारी त्यांच्या घरी होते. त्यावेळी त्यांना अनोळखी व्यक्तीने फोन केला. फोनवरून 25 लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी दिली नाही तर जिवे मारण्याची आणि कुटुंबाला क्षती पोहोचविण्याची धमकी देत शिवीगाळ केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.