इराणचं सैन्य ‘पूर्णपणे उद्ध्वस्त’ झाल्याचाही दावा

0
3

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी (6 मार्च) म्हटलं की, अमेरिका इराणविरोधात चांगलं काम करत आहे. इराणचं सैन्य ‘पूर्णपणे उद्ध्वस्त’ झाल्याचाही दावा त्यांनी केला.व्हाईट हाऊसमध्ये कॉलेज स्पोर्टसवर आयोजित राउंडटेबल दरम्यान ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एका प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, “आमचं सैन्य अतिशय चांगली कामगिरी करत आहेत”ट्रम्प म्हणाले, “त्यांचं (इराण) सैन्य संपलं आहे, त्यांचं नौदलही संपुष्टात आलं असून हवाईदलही पूर्णपणे नष्ट झालं आहे. त्यांचं कम्युनिकेशन बंद पडलं असून पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील नेतृत्व संपलं आहे. त्यांच्याकडे आता तिसऱ्या फळीतील नेतृत्व उरलं आहे.”
“त्यांच्याकडे 32 जहाजं होती, ती सर्व जहाजं समुद्रात बुडाली आहेत”, असाही दावा त्यांनी केला.
इराणच्या महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या विमानतळांपैकी एक असलेल्या मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हीडिओ फुटेजमध्ये मेहराबाद विमानतळावर जळणारी विमाने आणि त्यातून निघणारा धूर दिसत आहे. शुक्रवारी (6 मार्च) घेतलेल्या उपग्रह छायाचित्रांमध्ये विमानतळावर अनेक विमान असल्याचं दिसून येत आहे.
इराणच्या सरकारी माध्यमांनीही विमानतळाच्या काही भागांना लक्ष्य करण्यात आल्याचं वृत्त दिलं आहे.