दि. 4 ( पीसीबी ) –महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळानुसार इयत्ता बारावीचा फेब्रुवारी-मार्च 2025 चा निकाल 5 मे रोजी लागणार आहे. दुपारी 1 वाजता लागणार आहे. शिक्षण मंडळाने निकाल पाहण्यासाठी काही संकेतस्थळे दिलेली आहेत.
शिक्षण मंडळाने नेमके काय सांगितले? (How to download HSC Result)
मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांत ही परीक्षा घेण्यात आली होती. हा निकाल सोमवारी दिनाक 5 मे 2025 रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना कोणत्या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल?
https://results.digilocker.gov.in https://mahahsscboard.in http://hscresult.mkcl.org https://results.targetpublications.org https://results.navneet.com https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
निकाल कसा पाहावा. (How to check HSC Result)
वर नमूद केलेल्या कोणत्याही एक संकेतस्थळावर क्लिक करावे. त्यानंतर View HSC Result या ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतर त्यांनी विचारलेली माहिती टाकून तुमचा निकाल पाहावा. तसेच पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी या निकालाची प्रत डाऊनलोड करून घ्यावी.