इमारतीच्या पार्किंग मधून दुचाकी चोरीला; तिघांना अटक

0
94

चाकण, दि. ११ (पीसीबी)

इमारतीच्या पार्किंग मध्ये पार्क केलेली दुचाकी रात्रीच्या वेळी तीन चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 10) सकाळी मेदनकरवाडी येथे उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

निखिल माधवराव भालेराव (वय 22), रामप्रकाश कोरी (वय 29), धनीराम विश्वकर्मा (वय 18, सर्व रा. बर्गेवस्ती, कुरुळी, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी शिवराय गुंडाप्पा मेदा (वय 30, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवराय यांनी त्यांची 50 हजार रुपये किमतीची दुचाकी (केए 03/एचपी 8442) त्यांच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केली. रात्रीच्या वेळी चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. त्यानंतर चाकण पोलिसांनी तिघांना अटक केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.