इनोव्हाची रिक्षाला धडक; महिला गंभीर जखमी

0
40

देहूरोड, दि. 17 (प्रतिनिधी) : भरधाव इनोव्हा कारने एका रिक्षाला धडक दिली. यामध्ये रिक्षातील महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात 14 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास केंद्रीय विद्यालयासमोर देहूरोड येथे घडला.

नामदेव मुरलीधर राखपसरे (वय 45, बालेवडी, ता. हवेली) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कारचालक संजय नारायण कांबळे (वय 38, रा. दापोडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कांबळे याने त्याच्या ताब्यातील इनोव्हा कार भरधाव वेगात चालवून फिर्यादी यांच्या रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षातील महिला गंभीर जखमी झाली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.