“इतकी भिकारXX झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही (खोके) देऊ”

0
325

औरंगाबाद, दि. ७ (पीसीबी) : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अब्दुल सत्तार यांनी “इतकी भिकारXX झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही (खोके) देऊ”, असं म्हटलं. यानंतर पुन्हा एकदा सत्तार यांनी “ते आम्हाला खोके बोलू लागले आहेत, आमचे खोके त्यांचे डोके तपासावे लागेल, ज्यांचे डोके तपासावे लागेल खोक्याची आठवण येऊ लागली आहे त्यांच्यासाठी सिल्लोडमध्ये दवाखाना उघडावा लागेल. त्या दवाखान्यात खोके खोके बोलतात त्यांचे डोके तपासावे लागले. हे भिकारXX लोक, राजकारणच भिकारी धंदा आहे. आम्ही दररोज लोकसभा, विधानसभेसाठी मतांची भीक मागतो”, असं अब्दुल सत्तार म्हणाले.

अब्दुल सत्तारांवर टीकेची झोड
महाराष्ट्रातील अनुभवी मंत्र्यानं घाणेरड्या पातळीवर जाऊन बोलणं चुकीचं आहे. अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा काँग्रेस तर्फे निषेध करते. सत्तार यांनी या प्रकरणी माफी मागावी, असं काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील नेत्या रुपाली ठोंबरे यांनी अब्दुल सत्तार यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा दिला आहे. सत्तार यांनी या प्रकरणी माफी मागावी, असा इशारा रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून २४ तासांचा अल्टिमेटम
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अब्दुल सत्तार यांना शब्द मागं घेण्यासाठी २४ तासांची मुदत देत असल्याचं म्हटलं. येत्या २४ तासात अब्दुल सत्तार यांनी माफी मागावी, असं मिटकरी म्हणाले. तर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महेबूब शेख यांनी सत्तार यांचे पुतळे महाराष्ट्रभर जाळले जातील, असं म्हटलं आहे. परवा गुलाबराव पाटील आणि आता अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरले आहेत, आम्ही त्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असं राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे.