इंस्टाग्राम अकाउंट हॅक करून अल्पवयीन मुलीची बदनामी

0
259

पिंपरी दि. १३(पीसीबी) -इंस्टाग्राम अकाउंट हॅक करून १५ वर्षीय मुलीचे फोटो आणि अश्लील मजकूर पोस्ट करत तिची बदनामी केली. ही घटना ९ जून ते १२ जुलै या कालावधीत घडली.

याप्रकरणी पीडित मुलीच्या ४० वर्षीय वडिलांनी मंगळवारी (दि. १२) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोबाईल क्रमांक धारक अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या १५ वर्षीय मुलीचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक केले. इंस्टाग्राम आयडी आणि त्याचा पासवर्ड बदलून त्यावर नवीन खाते अॅड केले. मुलीचा फोटो आणि मोबाईल नंबर अश्लील मजकुरासह पोस्ट केला. फिर्यादी यांच्या मुलीची सोशल मीडियावर बदनामी करून तिचा सोशल मीडियावर पाठलाग केला. फिर्यादी यांनाही ते फोटो पाठवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.