इंद्रायणी नदी पात्रातील अनधिकृत 29 बंगले पाडण्याची कारवाई सुरू

0
11

 दि . १७ पीसीबी – चिखली येथे इंद्रायणी नदी पात्रात भराव टाकून बांधलेले 29 बंगले पाडायची सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रीय हरित लवादाचे आदेशानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. जेसीबी, पोकलन सह 10 मशीन कारवाई करत आहेत. प्रचंड मोठा पोलिस बंदोबस्त आहे. कारवाई रोखण्यासाठी भाजप नेत्यांनी भरपूर प्रयत्न केले ते निष्फळ ठरले. नागरिकांनी रात्रीतून घरसमान हलविल्याने नुकसान टळले.