इंद्रायणी नदीपात्र क्षेत्रात चालू अनधिकृत विनापरवाना बांधकामावर कारवाई

0
318

पिंपरी, दि. १8 (पीसीबी) -पिंपरी – पिंपरी ‍चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील चिखली रिव्हर रेसिडन्सी मागील इंद्रायणी नदीपात्र क्षेत्रात चालू असलेल्या अनधिकृत विनापरवाना बांधकामावर निष्कासनाची कारवाई करून सुमारे ३६०० चौ.फुट क्षेत्रातील चालु असलेले अनाधिकृत बांधकामाचे निष्कासन करण्यात आले.

पिंपरी ‍चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे – पाटील, यांचे निर्देशानुसार कारवाई करणेत आली.
शनिवार दि १६ मार्च रोजी क क्षेत्रीय कार्यालयाचे पथकामार्फत उपआयुक्त अण्णा बोदडे तसेच उपअभियंता सुर्यकांत मोहिते यांच्या नेतृत्वाखाली कनिष्ठ अभियंता किरण सगर, रचना दळवी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक निकिता फ़डतरे,स्मिता गव्हाणे व मनपा कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बल, महाराष्ट्र पोलिस, यांच्या नियंत्रणाखाली सदर कारवाई करण्यात आली.

आज अखेर प्रभाग क्र.०२ चिखली / जाधववाडी परिसरातील सुमारे ३६००.००चौ.फुट आरसीसी बांधकामावर अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
दि.१६/०३/२०२४ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत क क्षेत्रीय कार्यालयाकडील अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल व महाराष्ट्र पोलीस पथक, सहभागी झाले होते.

दररोज शहराच्या विविध भागात अतिक्रमण कारवाई केली जात आहे. नागरिकांनी रस्त्यांवर बेवारस वाहने उभी करुन नये, तसेच अनधिकृत टप-या व पत्राशेड व बॅनर्स उभारु नये.तसेच फ़ुटपाथ स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, महानगरपालिका आयुक्त यांच्या निर्देशनानुसार सदर कारवाई केलेल्या ठिकाणी मनपा परवानगी घेतल्याशिवाय अनधिकृत पत्राशेड / बांधकाम करु नये, अशा सुचना देण्यात आल्या.

नदी पात्र व इतर परिसरात नागरिकांनी अनधिकृत विनापरवाना बांधकाम करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल असे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.