दि.26 (पीसीबी) – देहुगाव येथे इंद्रायणी नदीत उडी मारून एका तरुणाने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि. 25) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. तरुणाने गाथा मंदिराजवळ असलेल्या पुलावरून नदीत उडी मारली.
अंकुश गजानन काळोखे (वय 30, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, अंकुश काळोखे याने गाथा मंदिराजवळ असलेल्या पुलावरून इंद्रायणी नदीत उडी मारली. स्थानिक नागरिकांनी याबाबत देहूरोड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एनडीआरएफला पाचारण केले. एनडीआरएफच्या जवानांनी दोन तास शोध घेऊन अंकुश याचा मृतदेह बाहेर काढला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.