इंद्रायणी नदीत आढळलेल्या मृतदेहाप्रकारणी खुनाचा गुन्हा दाखल

0
97

पिंपरी, दि. २१ ऑगस्ट (पीसीबी) दिघी,
दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंद्रायणी नदीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याबाबत दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा मृतदेह मंगळवारी (दि. 20) दुपारी तीन वाजताच्या सुमारास आढळून आला.

पोलीस उपनिरीक्षक दीपक रहाणे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंद्रायणी नगर मधील गल्ली नंबर चारच्या समोर इंद्रायणी नदी पात्रात मंगळवारी दुपारी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यात गंभीर जखमा होत्या. डोक्यात दगड घालून खून करत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नदीत फेकला आहे. मृतदेह आढळलेल्या व्यक्तीची ओळख पटली नाही. दिघी पोलीस तपास करीत आहेत.