महाळुंगे, दि. २४ (पीसीबी) – इंद्रायणी नदीच्या काठावर सुरु असलेल्या हातभट्टीच्या दारूभट्टीवर अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा मारून कारवाई केली. त्यात दहा लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 23) दुपारी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुभाषवाडी येथे करण्यात आली.
पोलीस शिपाई कपिलेश इगवे यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार करण गिरण्या गुडदावत (वय 23), तीरसागर चेतन मन्नावत (वय 22), गणेशजीवन मन्नावत (सर्व रा. सुभाषवाडी, निघोजे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाषवाडी येथे इंद्रायणी नदीच्या काठावर मोकळ्या जागेत हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी भट्टी लावली असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. त्यात पोलिसांनी दहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला. आरोपींनी 20 हजार लिटर गावठी दारू तयार करण्याचे रसायन तयार केले होते. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.