इंद्रायणीनगरला गुरुवारी मोफत ह्रदयरोग तपासणी शिबीर

0
5

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
पिंपरी, दि. २३ –
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दि.२४ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत मोफत ह्रदयरोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमाताई सावळे आणि बांधकाम कामगार संघाचे प्रदेशाध्यक्ष सारंग कामतेकर यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. भोसरी इंद्रायणीनगर येथील राजयोग सोसायटी शेजारी पद्मावती सोसायटी समोरील श्रीराम मंदिर येथे हे शिबीर होणार आहे.
प्रभागातील सर्व नागरिकांसाठी ह्रदयरोगग्रस्त रुग्णांची मोफत तपासणी होणार आहे. शिबीरात ह्रदयरोग तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जाईल, ब्लडप्रेशर तपासणी, ईसीजी मोफत होईल. उच्चरक्तदाब, मधुमेहग्रस्त आणि ह्रदयरोग ग्रस्त नागरिकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिमाताई सावळे आणि सारंग कामतेकर यांनी केले आहे.
रुबी अलकेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सुपरस्पेशालिटी कार्डियाक केअर सेंटर यांच्या सहयोगाने हे शिबीर होत आहे. सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी सकाळी १० पासून नोंदणी सुरू होईल. नाव नोंदणीसाठी सिमाताई सावळे (९९२२५०१६०७), संदीप नलावडे (९७६३४७९३५५०), अरुण गरड (९७६७०३१६७७), अनिकेत पोतदार (७२४९९०७२६०), अश्फाक सय्यद (९९४४७८६४२४), संदेश प्रधान (७६६६९६४३३५) या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.