इंद्रायणीनगरचा शांतता, सलोखा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणार – अजित गव्हाणे

0
57
  • कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून दिसला परिवर्तनाचा जागर

भोसरी, दि. १५ –

इंद्रायणीनगर येथील शांतता व सलोखा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अजित गव्हाणे म्हणाले. इंद्रायणी नगर भागामध्ये सार्वजनिक गणपती मंडळांच्या बाप्पांचे दर्शन घेऊन त्यांनी बाप्पांची आरती केली. यावेळी त्यांना मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. रात्री उशिरापर्यंत मंडळाच्या कार्यकर्त्यांशी अजित गव्हाणे यांनी संवाद साधला. कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून यंदा परिवर्तनाचा जागर होणार असल्याचे चित्र दिसून येत होते.

इंद्रायणी नगर भागातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतीचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दर्शन केले. यावेळी माजी नगरसेवक संजय वाबळे, विक्रांत लांडे तसेच संजय उदावंत, विजय पिरंगुटे, माणिक जैद, विठ्ठल माने, दत्तात्रय दिवटे, पांडुरंग सांडभोर, प्रमोद शिरसाठ, मोहन टाकळकर, अशोक तनपुरे, बाळासाहेब पवार बाळासाहेब जाधव, राजू देशपांडे, दादा कांडेकर, मधुकर गुंजकर, लक्ष्मण नगरे, उपस्थित होते.

बाप्पांची आरती करत गव्हाणे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधला. या संवादातून इंद्रायणीनगर भागातील समस्या, नागरिकांचे प्रश्न, व्यापारी लघुउद्योजक यांच्याकडून आलेल्या सूचना गव्हाणे यांनी ऐकून घेतल्या. इंद्रायणीनगर येथील शांतता सलोखा आपल्याला कायम टिकवून ठेवायचा आहे असे देखील गव्हाणे यांनी नागरिकांना आश्र्वस्थ केले.

अजित गव्हाणे यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले इंद्रायणी नगर हे येथील नियोजन, व्यवस्थापन आणि महत्वाचे म्हणजे शांततेसाठी ओळखले जाते. ही शांतता गेल्या दहा वर्षात हरवली आहे अशा नागरिकांच्या तक्रारी त्यांच्या गाठीभेटी घेताना दिसून येतात. आपण सर्वांनी एकत्र येत इंद्रायणीनगर मधील शांतता आणि सलोखा टिकून ठेवायचा आहे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे गव्हाणे यावेळी म्हणाले.