इंद्रापार्क सोसायटीत पालखी सोहळा; विठूनामाच्या जयघोषात अवतरली पंढरी

0
4

दि . ७ ( पीसीबी ) – हातात भगवे ध्वज, टाळ, डोक्यावर छोटे तुळशी वृंदावन घेतलेले संत वेशातील बालगोपाल अन् टाळ चिपळ्यांच्या नादात ग्यानबा तुकाराम हा गगनभेदी जयघोष!! मध्यभागी फुलांनी सजवलेली आकर्षक विठ्ठल रुखमाई ची पालखी, पारंपरिक वेशातील सोसायटीतील महिला पुरुष!! अशी जणू पंढरीच अवतरली होती, निमित्त होते आषाढी एकादशीचे.
या पावन पर्वावर रावेत किवळे भागातील इंद्रा पार्क सोसायटी मध्ये भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
विठ्ठल रुखमाईच्या मूर्तीचे पूजन करून विठ्ठल जयघोषात पालखी सोहळ्याची सुरुवात झाली, फुलांच्या माळांनी परिसर सजविण्यात आला होता. फुगडी, पावली करीत पालखी सोसायटी मधील प्रमुख मार्गाने आल्यानंतर महिलांनी भजने अभंग सादर केले त्यानंतर महाआरती करण्यात येऊन प्रसाद वितरण करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सोसायटी पदाधिकारी, सांस्कृतिक समिती व महिलांनी विशेष परिश्रम घेतले.