पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त इंडो ऍथलेटिक सोसायटी तर्फे आज शनिवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी नवरात्रीचे निमित्ताने वॉक आणि रन आयोजन करण्यात आले यामध्ये तब्बल १००० धावपटूंनी सहभाग घेतला, रावेत ब्रिज येथे रात्री सात वाजता महावीर अन्नदान सेवा ट्रस्टचे अध्यक्ष दर्शन लुंकड यांचा तर्फे झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली तब्बल 21 किलोमीटरचे अंतर पार करून सर्व धावपटू चतुर्शृंगी देवीच्या मंदिरामध्ये पोहोचले.
नऊ दिवस पुणे व आसपास परिसरातील वेगवेगळ्या देवींच्या मंदिरामध्ये सायकल फेरी आयोजित करण्यात आली होती जवळपास शंभरहून अधिक सायकलिस्ट सहभाग घेत होते. मागील सात दिवसांमध्ये चतुर्श्रुंगी , तांबडी जोगेश्वरी, माण येथील माणदेवी, सारसबाग येथील महालक्ष्मी देवी , बाणेरची तुकाई देवी व पुढे कार्ल्याची एकविरा आकुर्डी येथील तुळजाभवानी व दुर्गा टेकडी येथील दुर्गा देवीच्या दर्शनाची सायकल राईड आयोजित केली आहे. सदर सर्व राईडचे नेतृत्व अविनाश चौगुले , गिरीराज उमरीकर व रमेश माने यांच्यातर्फे करण्यात आले होते.
सर्व स्पर्धकांना अल्पोपाराचे आयोजन महावीर अन्नदान सेवा ट्रस्टचे अध्यक्ष दर्शन लुंकड व सहकारी यांच्यातर्फे करण्यात आले,या नवरात्री उत्सव नियोजन समितीमध्ये गणेश भुजबळ,अजित पाटील,अमृता पाटील, अंकिता चौगुले, सोनल वामन, प्रशांत तायडे,शैलेश गिरी, अनुजा पवार, सुधाकर टिळेकर, कैलास शेठ तापकीर,दीप्ती सचिन पाटील, अजित गोरे राजेंद्र शिरसाट, दीपालक्ष्मी सोनवणे, मदन शिंदे , मारुती विधाते, तुषार देशमुख, तुषार पाटील इतर सदस्यांचा सहभाग होता. तर सदर राईट साठी अण्णारे बिरादार, डॉक्टर सुहास माटे, सी ए के एल बंसल, नरेंद्र साळुंखे, पोलीस अधिकारी अजय दरेकर यांच्यातर्फे शुभेच्छा देण्यात आले.