इंडिया आघाडी ची ईव्हीएम विरोधी जोरदार निदर्शने

0
196

पिंपरी, दि. ११ (पीसीबी)- इंडिया आघाडी- पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी ईव्हीएम विरोधी निदर्शने पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये करण्यात आली. पिंपरी चिंचवड शहर इंडिया आघाडीचे निमंत्रण मानव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामध्ये राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, आम आदमी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, स्वराज इंडिया, यांच्यासह नागरी हक्क सुरक्षा समिती, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, छावा युवा मराठा महासंघ, भिमशाही युवा संघटना, बारा बलुतेदार महासंघ, महाराष्ट्र रिक्षा पंचायत, स्वराज अभियान, हम भारत के लोग या सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला.

या कार्यक्रमांमध्ये समाज कार्यकर्ते मारुती भापकर राष्ट्रीय काँग्रेसचे शहर वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे डॉ. मनीषा गरुड, राष्ट्रवादी काँग्रेसचे सागर चिंचवडे, गणेश भोंडवे, विशाल जाधव, आबादी पक्षाचे वैजनाथ शिरसाठ व त्यांचे सहकारी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड गणेश दराडे, अपर्णा दराडे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड अनिल रोहम, शिवसेनेचे माजी नगरसेवक अनंत कोराळे, सामाजिक कार्यकर्ते प्रताप गुरव सतीश काळे, प्रकाश जाधव, प्रवीण कदम, युवराज दाखले, आकाश शिंदे, नंदकुमार पोटे, प्रदीप पवार, दिलीप काकडे, पी. बी. पाटील, एडवोकेट सतीश कांबिये, यांच्यासह अनेक संस्था संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.