इंडियन मेडिकल असोसिएशन पीसीबीच्या अध्यक्षपदी डॉ सुशील मुथियान

0
290

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – इंडियन मेडिकल असोसएशनच्या पिंपरी चिंचवड भोसरी(पीसीबी) च्या अध्यक्षपदी डॉ सुशील मुथियान तर सचिवपदी डॉ अनिरुद्ध टोनगावकर यांची निवड करण्यात आली. बालेवाडी येथील ऑर्चीड हॉटेलमध्ये हो पदग्रहण सोहळा संपन्न झाला.
आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शरदकुमार अगरवाल,उपाध्यक्ष डॉ जयेश लेले,उपाध्यक्ष डॉ शिवकुमार उत्तुरे,डॉ मंगेश पाटे,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे,मावळते अध्यक्ष डॉ विजय सातव, सचिव हेमंत पाटील,डॉ दिलीप कामत आदी मान्यवर उपस्थित होते. शहरातील तब्बल ९०० डॉक्टर सभासद असलेली ही संघटना आहे.

डॉ अगरवाल यांनी राबवलेल्या “आओ गांव चले” या मोहिमेच्या अंतर्गत डॉ. मुथियान यांनी मावळ येथील गोडूंब्रे हे गाव शैक्षणिक व वैद्यकीय सेवेकरीता दत्तक घेतल्याची माहिती दिली. वाचनालय उभारणी चे काम प्रथम करणार सरपंच निशा गणेश सावंत ह्या उपस्थित होत्या.
नवीन कार्यकारी मंडळ पुढीलप्रमाणे-
डॉ सुशील मुथियान – अध्यक्ष
डॉ अनिरुद्ध टोणगावकर – सचिव
डॉ सुहास लुंकड – (सहसचिव)
डॉ विकास मंडलेचा – (खजिनदार)
डॉ माया भालेराव -(नियोजित अध्यक्ष)
डॉ सुधीर भालेराव –
डॉ.ललित धोका( दोघेही उपाध्यक्ष)