इंडियन मेडिकल असोसएशनच्या पिंपरी चिंचवड भोसरी शाखाच्या अध्यक्षपदी डॉ माया भालेराव तर सचिवपदी डॉ सारिका लोणकर व खजिनदार म्हणून डॉ मनिषा डोइफोडे यांनी सुत्रे स्विकारली. चिंचवड येथील नुर्या हॉटेल मध्ये दि. 6 एप्रिल रोजी हा पदग्रहण सोहळा संपन्न झाला.
शहरातील तब्बल ९०० डॉक्टर सभासद असलेली ही राष्ट्रीय संघटना गेली 10 वर्षा पासुन कार्यरत आहे. आयएमएचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ शिवकुमार उत्तुरे व महाराष्ट्र राज्य आयएमए उपाध्यक्ष डॉ वैजयंती पटवर्धन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत होते. त्यांनी समस्त डॉक्टरांना मार्गदर्शन केले. त्याच बरोबर विश्वस्थ डॉ दिलीप कामत, डॉ. संजय देवधर, डॉ.सुहास माटे, डॉ.विजय सातव, डॉ. प्रभाकर बुरूटे, डॉ. माधव कुलकर्णी ,मावळते अध्यक्ष डॉ सुशील मुथियान , डॉ. अनिरुद्ध टोणगावकर , डॉ.विकास मंडलेचा आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वेग वेगळया स्वास्थ्य कार्यक्रमाची नियोजिका डॉ.माया भालेराव यांनी सादर केली. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. सुधीर भालेराव आणि डॉ. सुहास लुंकड यांनी केली.
नवीन कार्यकारी मंडळ पुढीलप्रमाणे-
डॉ माया भालेराव – अध्यक्ष
डॉ सारिका लोणकर-
सचिव
डॉ मनिषा डोईफोडे खजिनदार
डॉ सुधीर भालेराव- नियोजित अध्यक्ष
डॉ ललित कुमार धोका- उपाध्यक्ष
डॉ अनिरुद्ध टोणगावकर- उपाध्यक्ष
डॉ सुमीत लाड- संपादक (स्पंदन )
डॉ ज्योती डेकाते- महिला डॉक्टर चेअरमन
डॉ सुहास लुंकड – (सहसचिव)
डॉ दीपाली टोणगावकर (सह खजिनदार )
कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. मनीषा डोईफोडे आणि डॉ.वर्षा कुर्हाडे यांनी केले. सचिव डॉ. सारिका लोणकर यांनी आभार व्यक्त केले.










































