इंडिकेटर लावण्यास सांगितल्याने एकास मारहाण

0
118
fight

पिंपरी, दि.10 (पीसीबी) दिघी,
इंडिकेटर लावण्यास सांगितल्याने ‘मी इथला गाववाला आहे. तुझा मर्डर करेन’ असे म्हणत एकास बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी (दि. 8) रात्री नऊ वाजता वडमुखवाडी येथील रविकिरण सोसायटी येथे घडली.

शुभम दशरथ तापकीर (रा. चऱ्होली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी प्रशांत दत्तात्रय गिलबिले (वय 44, रा. वडमुखवाडी, चऱ्होली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गिलबिले रविकिरण सोसायटी समोर आले असता समोरून येणारा टेम्पो अचानक उजवीकडे वळण घेत होता. त्यामुळे टेम्पो चालकाला इंडिकेटर लावण्यास गिलबिले यांनी सांगितले. त्या कारणावरून आरोपी शुभम तपकीर याने ‘मी इथला गाववाला तपकीर आहे. तू इथून गप निघून जा. नाहीतर मी तुझा मर्डर करेन’ अशी धमकी देत शिवीगाळ केली. त्यानंतर गाडीतील रॉडकाढून गिलबिले यांना पायावर व डोक्यात मारून गंभीर जखमी केले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.