इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका मॅच वर सट्टा घेणारा अटकेत

0
1281

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका मॅच वर सट्टा घेणारा बुकी दिनेश शर्मा अटक , ४० लाखांची रोकड जप्त अँटी गुंडा स्कॉड ची मोठी कारवाई….पिंपरी चिंचवड सध्या सगळीकड वर्ल्ड कप चा फिवर सुरू असताना इंग्लंड विरूद्ध दक्षिण आफ्रिका या क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या बुक्किला पिंपरी चिंचवड पोलीसांच्या अँटी गुंडा स्कॉड ने केली अटक करत त्याच्याकडून तब्बल ४० लाख रुपयांच्या रोकड जप्त केलीय यातील आरोपी नामे दिनेश हरिश शर्मा हा पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरातील आदी आम्मा ब्लिस या सोसायटी मधील एका फ्लॅट मध्ये “क्रिकेट लाईव्ह गुरू” या सोशल मीडिया ॲपवरून सट्टा लावत होता. त्याचं वेळी अँटी गुंडा स्कॉड चे प्रमुख हरीश माने यांनी गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळवत आरोपी शर्मा ला अटक केली तर त्याचे साथीदार धनु, शिवण आणि दिनेश शर्मा यांच्या वर महाराष्ट्र जुगार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. त्यांच्या कडून ४० लाख रुपये रोकड, २ मोबाइल, १ कॅल्क्युलेटर असा १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.अधिक तपास पिंपरी चिंचवड पोलिस करत आहेत.