इंग्लंड मधील कंपनी आणि भारतातील विक्रेता यांच्यात मध्यस्थी करण्याच्या बहाण्याने 19 लाखांची फसवणूक

0
117

शिरगाव,दि. 08 (पीसीबी)

इंग्लंड मधील एका कंपनीला कच्च्या तेलाची आवश्यकता आहे. ते तेल भारतामध्ये मिळते. भारतातील स्थानिक विक्रेता आणि इंग्लंड मधील कंपनी यांच्यामध्ये मध्यस्थी करून चांगला नफा मिळविण्याचे अमिष दाखवून एका व्यक्तीची 19 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 13 मार्च ते 11 सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून घडली.

याप्रकरणी 42 वर्षीय व्यक्तीने शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार [email protected] मेल आयडी धारक व 447466640625 क्रमांकावरून व्हॉट्स अप वापरणारी महिला एलिसा जेन्सन, मोबाईल क्रमांक 7900141856/9833486694 व [email protected] मेल आयडी वापरणारा विजय रेड्डी, 1(403)6684839 व [email protected] वापरणारा डॉ. ब्रयन एनव्हर्ड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगणमत करून फिर्यादी यांना मेल आयडी द्वारे तसेच व्हाट्सअप व मोबाईल फोनवरून वेळोवेळी संपर्क केला. युके मधील कंपनीसाठी लागणारे TANOLDINE RAW OIL भारतामध्ये मिळत आहे. युके मधील कंपनी व भारतातील स्थानिक विक्रेता यांच्यामध्ये फिर्यादी यांना मध्यस्थ म्हणून काम केल्यास 60 टक्के प्रॉफिट देण्याचे आरोपींनी आमिष दाखवले. त्यानंतर विजय रेड्डी यांच्याकडून 25 लिटर ऑइल खरेदी करण्यासाठी फिर्यादी यांना वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून 19 लाख 10 हजार 500 रुपये घेतले. त्यानंतर पुढील व्यवहार न करता त्यांची फसवणूक केली. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.