इंग्लंडमध्ये मंदिरासमोर मुस्लीम जमावाने आंदोलन

0
525

लंडन, दि. २१ (पीसीबी) – लंडनमधील लीसेस्टरमध्ये हिंदू मंदिराच्या तोडफोडीसह हिंसाचाराच्या घटनेनंतर आता इंग्लंडमधील स्मेथविक शहरातील एका हिंदू मंदिरासमोर कथित मुस्लीम जमावाने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मंदिराकडे जात असताना हा जमाव अल्लाहू अकबरचे नारे देतानाचा कथित व्हिडीओ समोर आला आहे. हे आंदोलक स्मेथविक परिसरातील दुर्गा भवन हिंदू मंदिराकडे जात होते. येथील सुरक्षा यंत्रणांनी जमावाला थांबवत कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचा प्रयत्न केला असता, यातील काही आंदोलकांनी भिंतीवर चढण्याचाही प्रयत्न केला.