आसाम राज्यातील ब्रह्मपुत्रा नदीत महाराष्ट्राचे लोकप्रिय दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे विधिवत विसर्जन करण्यात आले

0
1

दि.०४(पीसीबी)-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्व. अजितदादा पवार यांचा अस्थिकलश आसाम येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी आसाम, मेघालय व मिझोरम या राज्यांतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अस्थिकलशाचे भावपूर्ण दर्शन घेतले.

ब्रह्मपुत्रा नदीच्या तीरावर विधिवत धार्मिक विधी व पूजा करण्यात आल्यानंतर स्व. अजितदादा पवार यांच्या अस्थींचे श्रद्धेने विसर्जन करण्यात आले.या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मा. संजय प्रजापती जी तसेच आसाम, मेघालय व मिझोरम येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.