आषाढी एकादशी यात्रेसाठी वैष्णव चॅरीटेबल व मेडिकल ट्रस्ट तर्फे मोफत वैद्यकीय सेवा

0
250

पिंपरी दि. २५ (पीसीबी) – शुक्रवार दिनांक २४ जुन रोजी गेल्या २९ वर्षे अनाथाश्रम, आश्रम शाळा,आदीवासी भाग वारकरी भक्त यांची सेवा करण्यार्या वैष्णव चॅरीटेबल व मेडिकल ट्रस्ट ची दोन वर्षोच्या कोव्हिड काल खंडा नंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रे करीता आलेल्या वारकरी मंडळींच्या मोफत वैद्यकीय सेवे करीता निगडी प्राधिकरण येथील संत तुकाराम उद्यान येथुन वैष्णव चॅरीटेबल व मेडिकल ट्रस्ट च्या वतीने वैद्यकीय पथक, डॉक्टर व अंब्युलन्स पाठवण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मंचक ईप्पर साहेब (पोलीस उपायुक्त) पिंपरी चिंचवड यांच्या हस्ते अंब्युलन्स व औषध वाहतूक करणाऱ्या ट्रक चे हार घालून श्रीफळ वाढवून करण्यात आले, त्या वेळेस कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय मा: उपमहापौर सौ शैलजा ताई मोरे, आदरणीय श्री संतोषजी खिंवसरा (अध्यक्ष पिंपरी चिंचवड ड्रगीस्ट आणि फार्मीस्ट असोसिएशन) आदरणीय श्री महावीरजी मित्तल (महाराष्ट्र पेंट्स) ,जगराम चौधरी विश्वस्त श्रीराम नलावडे, डॉ वसंतराव गोरडे, प्रकाश सातव, मिलिंद देशमुख , भाऊ ठोंबरे,भीमजी विधाते, डॉ रामनाथ बच्छाव उपस्थित होते.

त्या वेळेस खरा वैष्णव वारी विशेषांकाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन व आयोजन पुणे वारी व्यवस्थापन प्रमुख मुकेश सोमैय्या यांनी केले.