आळंदी मध्ये 11 लाखांची घरफोडी

0
273

आळंदी मधील दत्तनगर येथे घरफोडी करून चोरट्यांनी 10 लाख 90 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 23) सायंकाळी सात वाजता उघडकीस आली.

वासुदेव नथू शेलार (वय 65, रा. दत्तनगर, आळंदी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेलार यांचे घर शनिवारी (दि. 22) सकाळी दहा ते रविवारी सायंकाळी सात पर्यंत कुलूप लाऊन बंद होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून पाच लाख 50 हजार रुपये रोख रक्कम आणि 180 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा ए