आळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरीमंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दी

0
114

दि २० मे (पीसीबी ) आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील माऊली मंदिरात मोहिनी एकादशी धार्मिक परंपरेने पवमान अभिषेख, नित्यउपचार पूजाविधा, महानैवेद्य, धुपारती आदी कार्यक्रमानी मोहिनी एकादशी आळंदीत साजरी करण्यात आली. मोहिनी एकादशीचा दुर्मिळ योग भाविकांना लाभला. मोहिनी एकादशीचे उपवासाचा परिणाम जवळ जवळ संपूर्ण जीवनात एकादशी केल्याच फळ प्राप्त होते असा असल्याची भावना वारकरी संप्रदायात असल्याने या एकादशीला खूप महत्त्व आहे. आळंदी मंदिरात गाभारा आकर्षक पुष्पसजावटीने सजविण्यात आला होता. आळंदी देवस्थानने भाविकांना पिण्याचे पाणी वाटपाचे दर्शन बारीक थेट नियोजन केल्याने भाविकांची सोय झाली.
मोहिनी एकादशी पर्वकाळ रविवारी ( दि १९ ) एकादशी केल्यास आयुष्यभर एकादशी केलेचे पुण्य अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. मोहिनी एकादशी आळंदी, देहु पंचक्रोशीत धार्मिक महत्त्व ओळखून साजरी झाली. या एकादशीला वारकरी संप्रदायात फार मोठे महत्व आहे. त्याच प्रमाणे हरिनाम गजरात एकादशी साजरी करण्यात आली. या निमित्त विश्वस्त योगी निरंजननाथजी, व्यवस्थापक माऊली वीर , सेवक कर्मचारी यांनी नियोजन केले. मंदिरातील श्रींचा गाभारा लक्षवेधी फुलांनी सजविण्यात आला होता. आळंदीत एकादशी दिनी अन्नदान फराळाचे वाटप उत्साहात करण्यात आले. एअकादशी दिनी सायंकाळी काहीवेळ जोरदार पाऊस आल्याने नागरिक, व्यापारी, भाविकांनी मिळेल त्या ठिकाणी थांबून निवारा गाठला. जोरदार पावसाने हजेरी लावल्याने पावसाचे कालावधीत आळंदीतील विविध रस्त्यावर पावसाचे पाण्याची डबकी साचून वाहिली. दिव्यांग बांधवानी आयोजित केलेल्या ज्ञानेश्वरी परायणाची हरिनाम गजरात सांगता झाली. यावेळी समाजरत्न नानजीभाई ठक्कर यांनी मार्गदर्शन करीत संवाद साधला. गेल्या दोन वर्षा पासून हे पारायण सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. आळंदी देवताशांचे सहकार्याने या पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान पावसाचा जोर वाढल्याने काही तास विद्युत पुरवठा खंडित झाल्याने सर्वत्रच भाविक, नागरिकांची गैरसोय झाली. आळंदी नगरपरिषदेने पावसाळी कामात रस्त्यावरून वाहणारे पाणी नाली, ड्रेनेज मधून कसे वाहील. या बाबातचे नियोजन करण्याची मागणी आळंदी जनहित फाउंडेशन तर्फे अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील यांनी केली आहे.