आळंदी पोलिसांचा दारूभट्टीवर छापा

0
148

आळंदी, दि. २२ (पीसीबी) – आळंदी पोलिसांनी कोयाळी गावात ओढ्याच्या काठावर लावलेल्या एका दारूभट्टीवर छापा मारला. यामध्ये पोलिसांनी एक लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 20) सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास करण्यात आली.

याप्रकरणी पोलीस अंमलदार शालू जाधव यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील कोयाळी गावात ओढ्याच्या काठावर एका महिलेने दारूभट्टी लावली असल्याची माहिती आळंदी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी सायंकाळी दारूभट्टीवर छापा मारून कारवाई केली. पोलीस आल्याची चाहूल लागतात संबंधित महिला दारूभट्टी लावलेल्या ठिकाणावरून पळून गेली. पोलिसांनी एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.