आळंदीत भर दिवसा चोरटयांनी केला ‘एवढ्या’ लाखांचा माल लंपास

0
99

आळंदी, दि. 29 (पीसीबी) : आळंदी मधील पद्मावती रोड येथे चोरट्यांनी भर दिवसा घर फोडले. घरातून तीन लाख 86 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 28) दुपारी साडेबारा ते दोन या कालावधीत घडली.


प्रशांत सूर्यभान शिरगुडे (वय 38, रा. पद्मावती रोड, आळंदी) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिरगुडे यांच्या सदनिकेचा दरवाजा बंद असताना अज्ञात चोरट्यांनी कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातून तीन लाख 86 हजार रुपये किमतीचे 143 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.