आळंदीत धर्मांतराचा प्रयत्न, गुन्हा दाखल

0
259

आळंदी, दि. ७ (पीसीबी) – आता एक धक्कादायक बातमी आळंदीमधून. आळंदीमध्ये काही जणांचा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आळंदी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी आळंदीमध्ये तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी आता तपास करत आहेत.

धर्म परिवर्तन केल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. तसेच या प्रकरणात आळंदी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. तुमचा धर्म सोडून द्या आणि येशूची पूजा करा असं आवाहन केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच येशूचं रक्त म्हणून द्राक्षाचं पाणी प्राशन करायला सांगितल्याची तक्रार करण्यात आलीय.आळंदीत याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात केला आहे. आता प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे
हा प्रकार आळंदीमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडला होता. या प्रकरणी 4 तारखेला गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकारचा जो व्हिडिओ बाहेर आला तो अत्यंत धक्कादायक आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला येशूचे रक्त म्हणून काहीतरी देताना दिसत आहे. तुम्ही येशूची पूजा करा, तुमचे सर्व आजार जातील, अशा पद्धतीने महिला नागरिकांना सांगत आहे. या प्रकाराला काही नागरिकांनी विरोध केला आणि त्यानंतर 4 तारखेला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व पुराव्यांच्या अभ्यासानंतर आरोपीवर कारवाई होईल असं पोलिसांनी स्पष्ट केले आहे.