आळंदीत आषाढी यात्रे निमित्त इंद्रायणीची आरती ; नदी घाटाची स्वच्छता

0
97

दि.१ ऑगस्ट (पीसीबी) आळंदी,  : तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ इं घेद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, महिला बचत गट सदस्य, पदाधिकारी, महिला मंडळ तसेच आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर महिलांनी घाट स्वच्छता करीत इंद्रायणीची आरती हरिनाम गजरात झाली. आषाढी वारी निमित्त एकादशी दिनी इंद्रायणीची आरती करून नदी घाट स्वच्छता करीत सामाजिक बांधिलकी जोपासली.
यावेळी शिवसेना शिरूर लोकसभा उपसंघटक ( उबाठा ) राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम, माजी नगरसेविका उषा नरके, स्वाती पजई, मोनिका बिडवे, राणी वाघ, वंदना लोखंडे, सन्याली ठाकूर, कल्याणी माळवे, शोभा कुलकर्णी, उषा नेटके, नमीता चौधरी, उषा ननवरे, अनिता शिंदे, लता शेवते, जिजाबाई भामरे, मीरा कांबळे, शालन होनावळे, नीलम कुरधोंडकर, ईश्वरी शिर्के, सविता कांबळे, विद्या आढाव, लता वर्तुळे, ताई सरोदे, माऊलींचे मानकरी गणपतराव कुऱ्हाडे, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, ज्ञानेश्वर घुंडरे पाटील, गोविंद ठाकूर तौर, पोलीस मित्र वेल्फेअर फाउंडेशन मराठवाडा विभाग प्रमुख रवींद्र जाधव, वैभव दहिफळे, सुरेश दौण्डकर आदींसह मोठ्या संख्येने महिला आळंदीकर ग्रामस्थ उपस्थित होते. इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासण्याचे आवाहन करीत इंद्रायणी नदी घाटावर आरती उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम यांनी केले. इंद्रायणी नदीचे प्रदूषण दूर करण्यासाठी शासनाने तात्काळ उपाय योजना कराव्यात असे आवाहन माऊलींचे मानकरी गणपतराव कुऱ्हाडे यांनी केले आहे. तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती ग्रुपचे वतीने अनिता झुजम, अर्जुन मेदनकर यांनी उपक्रमाचे आयोजन केले.