आळंदीत अजा एकादशी दिनी भाविकांची गर्दी

0
23

धार्मिक कार्यक्रमांसह इंद्रायणी घाटावर भगवा ध्वज लोकार्पण

आळंदी, दि. ३० ऑगस्ट (पीसीबी)- माऊली मंदिरात अजा एकादशी निमित्त विविध परंपरांसह धार्मिक महत्त्व जोपासत आळंदी देवस्थान तर्फे विविध कार्यक्रमांनी हरिनाम गजरात अजा एकादशी साजरी करण्यात आली. अजा एकादशी निमित्त आळंदीत लाखावर भाविकांनी माऊलींचे संजीवन समाधीचे दर्शन घेत मंदिर प्रदक्षिणा, नदी घाटावर इंद्रायणी दर्शन, वारकरी दिंड्यांची परंपरेने मंदिर आणि नगरप्रदक्षिणा हरीनाम गजर करीत झाली. नित्यनैमित्तिक माऊलींचे पालखीची गुरुवार निमित्त मंदिर प्रदक्षिणा परंपरांचे पालन करीत हरिनाम गजरात झाली. यावेळी भाविकांनी श्रींचे दर्शन घेण्यास पालखी मंदिर प्रदक्षिणा दरम्यान गर्दी करीत दर्शन घेतले. मंदिरात श्रीची पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य परंपरेने वाढविण्यात आला. दर्शन बारीत भाविकांनी गर्दी करीत रांगेतून दर्शन घेतले. मंदिरात धार्मिक कार्यक्रम हरिनाम गजरात झाले.


यावेळी पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, तुकाराम माने, बल्लाळेश्वर वाघमारे, सेवक चोपदार आदीसह वारकरी भाविक, आळंदी ग्रामस्थ आदी उपस्थित होते. भाविकांच्या सुलभ दर्शनास मंदिर व्यवस्थापनाने भाविकांची चोख व्यवस्था ठेवली. अजा एकादशी दिनी सुमारे एक लाखावर भाविकांनी श्रींचे दर्शन घेतल्याचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले. सुरक्षा रक्षक, सेवक, पोलिस यांनी बंदोबस्त तैनात केला. फराळाचे वाटप मंदिरात करण्यात आले. एकादशी निमित्त आलेल्या भाविक – वारकरी यांनी आळंदीत नगरप्रदक्षिणा करत नाम गजर केला.


इंद्रायणी घाटावर भगवा ध्वज लोकार्पण ; इंद्रायणी आरती उत्साहात
अलंकापुरीत एकादशी निमित्त इंद्रायणी नदी घाटाची स्वच्छता ; इंद्रायणीची आरती
तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, आळंदी जनहित फाउंडेशन , महिला बचत गट सदस्य, पदाधिकारी, महिला मंडळ तसेच आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर घाट अजा एअकादशी निमित्त नदी घाटावर स्वच्छता करीत घाट पाण्याने स्वच्छ धुवून घेत परिसरात स्वच्छता करण्यात आली. इंद्रायणी नदी घाटावर सामाजिक कार्यकर्ते अनिता झुजम, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, सारिका मेदगे, ईश्वर मेदगे यांचे प्रयत्नातून इंद्रायणी नदी घाटावर ३१ फूट उंचीचा भगवा ध्वज उभारण्यात आला. या ध्वजाची पूजा, इंद्रायणी आरती आणि परिसरात स्वच्छता उपक्रम राबवित भगवा ध्वज अजा एअकादशी दिनी लोकार्पण करण्यात आला. यावेळी हरिनाम गजरा करण्यात आला. एकादशी दिनी इंद्रायणी आरती करून नदी घाट स्वच्छता करीत सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली. यावेळी महिला भाविकांची उपस्थिती होती.


इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणीचे आरतीस राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम, शालन होनावळे, नीलम कुरधोंडकर, कल्याणी मालप, विद्या आढाव, अनिता शिंदे, उषा नेटके, चारुशीला पोटफोडे, अलका पतंगे, माजी नगरसेविका उषाताई नरके, लता वरतले, अनिता शिंदे, राणी वाघ, मीना मेहरा, विद्या आढाव, सुमन चव्हाण, शुभांगी यादव, मोहिनी माळवे, नंदा महाडिक, अरुणा जगताप, गोदावरी बिरादार, सविता कांबळे, संगीत केदार, सोनी टिंगरे, मीना शिंदे, द्रौपदी भोसले, कोमल यादव, मीरा कांबळे, प्रमिला रोकडे, राजकन्या सुडे, अरुणा गरड, वत्सल्या दाभाडे, रेखा मनोरे, सुनीता माने, अलका पतंगे, उज्जवला जुमले माऊलींचे मानकरी गणपतराव कुऱ्हाडे पाटील, रवींद्र जाधव, वैभव दहिफळे, राजेश नागरे, बाबासाहेब भंडारे, यांचेसह महिला, आळंदीकर ग्रामस्थ उपस्थित होते. इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासण्यासाठी तसेच स्वच्छता जनजागृती साठी आरती उपक्रम राबविण्यात येत आहे. यात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन अनिता झुजम यांनी केले. तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती ग्रुपचे वतीने अनिता झुजम, संयोजक अर्जुन मेदनकर यांनी उपक्रमाचे आयोजन केले.