आर टी ई ऑनलाईन लॉटरीनंतर निकाल जाहीर करण्यासाठी सात दिवसाच्या अवधीचे गौडबंगाल काय – चेतन बेंद्रे
पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – आरटीई प्रवेशाची ऑनलाईन लॉटरी 5 एप्रिल काढली परंतु त्याचा निकाल जाहीर करण्यासाठी प्रशासनाला तब्बल ७ दिवस एवढा वेळ कशासाठी असा आरोप आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराचे कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी केला आहे.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी आर. टी. ई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ०५ एप्रिल २०२३ रोजी ऑनलाईन पद्धतीने लॉटरी काढण्यात आली. लॉटरी काढल्यानंतर सर्व पालकांना अपेक्षा होती की लगेच निवड आणि वेटिंग ची यादी जाहीर होईल परंतु तसे न होता सदर यादी आणि त्याचे sms १२ एप्रिल २०२३ ला दुपारी ४ नंतर जाहीर करणार अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
आय.टी तंत्रज्ञानामध्ये आपल्या देशाने खूप प्रगती केली आहे तरी पण ऑनलाईन लॉटरी पद्धतीतून निवड झालेल्यांची यादी जाहीर करायला आपल्या देशा मध्ये ७ दिवस लागतात, ऑनलाइन अर्ज पद्धतीमध्ये ही सर्वर डाऊन झाल्याने पालकांना नमस्कार सोसावा लागला होता. आपल्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी धडपडणाऱ्या सामान्य जनतेच्या भावनेशी खेळ करत असून आर टी ई म्हणजे शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन असल्याची प्रतिक्रिया चेतन बेंद्रे यांनी व्यक्त केली.
त्यासंदर्भामध्ये पिंपरी चिंचवड मधील प्राथमिक शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन पुढील मागण्या करण्यात आल्या
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी झालेल्या ऑनलाईन लॉटरी नंतर म्हणजे ०५ एप्रिल २०२३ ते यादी जाहीर करे पर्यंत चे database चे ऑडिट रिपोर्ट किंवा database logs जाहीर करण्यात यावे. याच्या मागचे कारण असे की लॉटरी लागल्या नंतर मानवी हस्तक्षेपाने database मधील रेकॉर्ड update होऊ शकतात. त्यामुळे लॉटरी लागल्या नंतर कुठल्याही प्रकारचे manual update झाले असतील तर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी.