आर्थिक फायद्याचे प्रलोभन दाखवून 67 लाखांची फसवणूक

0
97

पिंपरी, दि. २२ ऑगस्ट (पीसीबी) निगडी,
आर्थिक फायद्याचे प्रलोभन दाखवून व्यापाऱ्याकडून 67 लाख 11 हजार रुपये घेत त्यांची फसवणूक केली. हा प्रकार मे 2017 ते 17 सप्टेंबर 2019 या कालावधीत नेवाळेवस्ती, चिखली येथे घडला.

सचिन जाधव आणि एक महिला (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रवीण शामराव बागडे (रा. नेवाळेवस्ती, चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार केली. फिर्यादी यांना आर्थिक फायदा होईल असे प्रलोभन दाखवले. फिर्यादी यांच्याकडून रोख स्वरुपात तसेच बँक खात्यावर 67 लाख 11 हजार रुपये रक्कम घेत त्यांना कोणताही परतावा न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.